आजही हैदराबादचे वादळ

 यंदाच्या आयपीएल मोसमात तब्बल तीन वेळा अडीचशे धावांचा टप्पा ओलांडणाऱया सनरायझर्स हैदराबादचे वादळ उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू रोखणार का? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. आठपैकी सात लढती गमाविणाऱया बंगळुरूचे प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यामुळे आणखी एका पराभवाचे त्यांची अंधुकशी आशाही संपुष्टात येणार आहे. दुसरीकडे सध्या तिसऱया स्थानावर असलेला हैदराबादचा संघ आणखी एका विजयासह गुणतालिकेत दुसऱया स्थानी झेप घेण्यासाठी उत्सुक असेल.

हैदराबादने सर्वप्रथम मुंबई इंडियन्सविरूद्ध 277 धावसंख्या उभारली होती. त्यानंतर बंगळुरूविरुद्ध 287 धावसंख्या उभारून स्वतःचाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला. मग दिल्लीविरुद्धही 266 धावांचा डोंगर उभारला होता. हैदराबादची तुफानी फलंदाजी बघता हा संघ टी-20 क्रिकेटमध्ये तीनशे धावांचा टप्पाही गाठू शकतो, असे वाटायला लागले आहे. बंगळुरूची गोलंदाजी सुमार असल्याने हैदराबादच्या फलंदाजांकडून या संघाला पुन्हा एकदा लक्ष केले जाऊ शकते. ट्रव्हिस हेड, हेन्रीक क्लासेन व एडेन मार्करम हे परदेशी फलंदाज तुफानी फॉर्मात आहेत. अभिषेक शर्मा व अब्दुल समद यांच्यामध्येही प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हवाई हल्ले करण्याची क्षमता आहे

कर्णधार पॅट कमिन्ससह भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट व टी. नटराजन असा दर्जेदार गोलंदाजी ताफाही हैदराबादच्या दिमतीला आहे. त्यामुळे बंगळुरूची पुन्हा एकदा हैदराबादविरुद्ध कसोटी लागणार आहे. .

बंगळुरूची मदार फलंदाजीवर

बंगळुरू संघात विराट कोहली, कर्णधार फाफ डय़ु प्लेसीस व दिनेश कार्तिक असे मॅचविनर फलंदाज आहेत, मात्र या संघातील फलंदाजांना गोलंदाजांकडून पाहिजे तशी साथ मिळत नाही. विल जॅक्स व रजत पाटीदार यांनाही मधल्या फळीत धावा काढण्यात अपयश येत आहे. बंगळुरूने आठपैकी सात लढती गमावल्या असल्या तरी यातील बहुतांश लढती अतिशय चुरशीच्या झाल्या  आहेत. विल जॅक्स, लॉकी फर्ग्युसन व रीक टॉपली या परदेशी गोलंदाजांनी निराशा केलेली