जयपूर एक्सप्रेस गोळीबारप्रकरणी आरोपपत्र दाखल

 रेल्वे सुरक्षा बलाचा (आरपीएफ) जवान चेतन सिंग चौधरीने केलेल्या गोळीबारप्रकरणी आज बोरिवली रेल्वे पोलिसांनी 1206 पानांचे आरोपपत्र बोरिवली न्यायालयात दाखल केले. पोलिसांनी 150 जणांचे जबाब नोंदवले आहेत.

जुलै महिन्यात जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये डय़ुटीला असलेल्या चेतनने प्रवाशी आणि आरपीएफचे अधिकारी यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून चेतनला अटक केली होती. गोळीबारप्रकरणी पोलिसांनी आज 1206 पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. चेतनला सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहण्याची विनंती करून बोरिवली दंडाधिकाऱ्यांकडे आरोपपत्र सादर केले. पोलिसांनी तीनजणांचे जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवले आहेत.