जालना लाठीचार्ज: पत्रकार परिषेदत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या उपस्थितीतच काढला ‘मावळ गोळीबाराचा मुद्दा’; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

devendra fadnavis ajit pawar

जालन्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी सुरू असेल्या उपोषणावेळी करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात सर्व स्तरांतून टिका झाली. त्यानंतर आज संयु्क्त पत्रकारपरिषद घेत फडणवीसांनी शासनाच्या वतीनं माफी मागितली. मात्र त्याच वेळी त्यांनी मावळमधील शेतकरी आंदोलनात झालेल्या गोळीबाराचा उल्लेख केला. विशेष म्हणजे त्यावेळी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. यावरून भाजपने याआधी वेळोवेळी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. तशा पोस्ट आजही भाजपच्या अधिकृत सोशलमीडिया पेजवर आहेत. मात्र अजित पवार हे आता फडवीसांसोबत सत्तेत असल्यानं त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख केला असला तरी या निमित्तानं त्यांनी अजित पवारांना शब्दांनी टोचण्याची संधी फडणवीसांनी सोडली नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

जालन्यात सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे शांततेत असलेले आंदोलक चिडले आणि संबंध मराहाराष्ट्रात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड टिका झाली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्यावर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रथम देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतिनं सकल मराठा आंदोलकांची माफी मागितली. मात्र त्याचवेळी राजीनामा मागणाऱ्यांना उत्तर दिलं. मात्र असं करताना त्यांनी मावळ मधील शेतकरी आंदोलनाचा स्पष्ट उल्लेख करत सवाल उपस्थित केले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: मावळ घटनेच्या वेळी देखील उपमुख्यमंत्री होते. आता त्यांच्याच उपस्थित देवेंद्र फडणवीस यांनी त्याच प्रसंगाचा उल्लेख केला. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे केलं असलं तरी अजित पवार यांना त्यातून टोचण्याचा प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे फडणवीस असे बोलत असाताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे मान खाली ठेवून शांत बसले होते.

भाजपने मावळ गोळीबारावरून अजित पवारांविरोधात टाकलेली पोस्ट पुढे दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेचं राजकारण होणं हे योग्य नाही. काही पक्षांनी आणि नेत्यांनी तोही प्रयत्न केला, हे दुर्दैवी आहे. विशेषत: जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश हे मंत्रालयातून आले, वरून आले, अशा प्रकारचा नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न झाला. सर्वांना माहित आहे की तसे आदेश देण्याचे अधिकार एसपी आणि डीवायएपींकडे असतात. त्याकरता कुणाला विचारायची गरज नसते. मग माझा सवाल असेल, ज्यावेळी निष्पाप 113 गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले त्याचा आदेश मंत्रालयातून आला होता का? मावळला शेतकरी मारले गेले तेव्हा ते आदेश हे तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनीच दिले होते का? एवढे निष्पाप शेतकरी मृत्युमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही?’. देवेंद्र फडणवीसांनी असे बोलत असाताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे मान खाली ठेवून शांत बसले होते.

पुढे बोलताना ‘मुळातच घटना चुकीची आहे, परंतु त्याचं राजकारण करून अशाप्रकारे जणूकाही सरकार हे करतं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला वाटतं की हे लोकांनाही कळतं की हे राजकारण सुरू आहे’, असं फडणवीस म्हणाले.

https://m.facebook.com/DevendraFadnavisforMaharashtra/videos/475074183635836/?_rdr