शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती ,जयंत पाटील यांचे सरकारला पत्र

राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या 29 टक्के पाऊस ठरावीक ठिकाणीच झाला आहे. पावसाच्या  23 दिवसांच्या खंडाने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. अशा परिस्थितीत  शेतकऱयांच्या आत्महत्येसारखे संकट उग्र होण्याची भीती आहे. परिणामी सरकारने  दुष्काळ जाहीर करून आवश्यक उपाय योजण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.राज्यातील सध्याच्या या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पत्र पाठवले आहे.

कोरडवाहू, जिरायती शेतीतील 70 टक्के पिके शेतकऱयांच्या हातातून गेल्यात जमा आहे. शेतकऱयांनी पेरणीकरिता, बियाणे – रासायनिक खते, औषधे यावर केलेल्या खर्चाचा परतावा मिळेल का नाही अशी शंका त्यांनी पत्रात उपस्थित केली आहे. जनावरांच्या चाऱयाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पावसाअभावी सिंचनासाठी कालव्यांना आवर्तने सोडण्यासाठी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तसेच या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. एपंदरीतच राज्यात आगामी काळात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीतीही व्यक्त केली आहे.