गणेशोत्सवाआधी तिकिटासाठी जागरण; कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाडय़ांचे 10 मेपासून बुकिंग

गणेशोत्सव आणि कोकणाचे वेगळेच नाते आहे. दरवर्षी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील लाखो चाकरमानी आपल्या कुटुंबकबिल्यासह गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होतात. यंदा गणपतीचे आगमन 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे त्याच्या 120 दिवस अगोदर म्हणजेच 10 मेपासून रेल्वे गाडय़ांचे बुपिंग सुरू होणार आहे. त्यामुळे कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी चाकरमान्यांची आखणी सुरू झाली असून तिकीट खिडकीवर सालाबादप्रमाणे यंदाही जागरण पाहायला मिळणार आहे.

गणपतीसाठी यंदा 10 मेपासून बुपिंग सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळेत तिकिटाचे बुकिंग करावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे बळीराम राणे यांनी केले आहे. दरम्यान, विशेष गाडय़ा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

7 सप्टेंबर रोजी गणपतीचे आगमन होत आहे. त्यामुळे सहा दिवस आधीच्या आरक्षणाच्या तारखांचा चार्ट पुढीलप्रमाणे असेल.

 शनिवार, 4  मे  रविवार, 1 सप्टेंबर रोजीच्या म्हणजे गणेशोत्सवापूर्वी सहा दिवस आधीचे आरक्षण

रविवार, 5 मे    सोमवार, 2 सप्टेंबर रोजी पाच दिवस आधीचे आरक्षण

सोमवार,  6 मे    3 सप्टेंबर रोजी चार दिवस आधीचे आरक्षण

मंगळवार, 7 मे 4 सप्टेंबर रोजी तीन दिवस आधीचे आरक्षण

बुधवार, 8 मे     5 सप्टेंबर रोजी दोन दिवस आधीचे आरक्षण

गुरुवार, 9 मे     6 सप्टेंबर (हरितालिका)

शुक्रवार, 10 मे   7 सप्टेंबर (गणेशचतुर्थी)

शनिवार, 11 मे 8 सप्टेंबर (ऋषी पंचमी)

रविवार, 12 मे 9 सप्टेंबर

सोमवार, 13 मे 10 सप्टेंबर (गौरी आगमन)

मंगळवार, 14 मे बुधवार  11 सप्टेंबर (गौरी पूजन)

बुधवार, 15 मे   12 सप्टेंबर (गौरी विसर्जन)