आरटीई प्रवेश अर्ज करण्यास उरले फक्त दोन दिवस

आरटीईअंतर्गत शाळांमधील 25 टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यास शेवटचे दोन दिवस उरले आहेत. राज्यात आरटीई प्रवेशाच्या तब्बल 8 लाख 86 हजार 411 जागा असून या जागांसाठी आतापर्यंत केवळ 43 हजार 783 विद्यार्थ्यांचेच अर्ज आले आहेत. प्रवेश अर्ज करण्याची मुदत 30 एप्रिलला संपणार असून अखेरच्या दिवसापर्यंत प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांची संख्या वाढेल का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

आरटीईअंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस 16 एप्रिलपासून सुरुवात झाली. मागील 12 दिवसांत राज्यातील किमान लाखभर विद्यार्थ्यांचादेखील प्रवेश अर्ज भरण्याकडे कल दिसलेला नाही. प्रवेश अर्ज करण्याची मुदत 30 एप्रिलला संपत असून दिलेल्या मुदतीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

या सहा जिह्यांतून सर्वाधिक प्रवेश अर्ज

पुणे                       –        12, 640

नागपूर                  –        6002

ठाणे                      –        3214

नाशिक                  –        3205

संभाजीनगर           –        2531

नगर                     –        1877

मुंबई                     –        1726

आरटीई प्रवेशासाठी मुंबई विभागातील उपलब्ध जागा

एकूण शाळा           –        1383

महापालिका           –        877

खासगी                  –        506

एकूण प्रवेश क्षमता           –        29,752

इयत्ता पहिली          –        29,014

पूर्व प्राथमिक          –        738

(एकूण 1383 शाळांपैकी 1319 शाळा या महापालिका शिक्षण विभागाच्या देखरेखीखाली, तर 64 शाळा या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत येतात.)