
मुंबईतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य देणाऱया जपानच्या जायका या संस्थेकडून आता राज्यातील वैद्यकीय शिक्षण, नार्सिंग, आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी 3 हजार 708 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य घेतले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
या वित्तीय मदतीतून वर्धा, पालघर, रत्नागिरी, अहिल्या नगर या नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी तसेच मुंबईतील जीटी, सेंट जॉर्ज, धुळे, सोलापूर, अंबेजोगाई, अकोला, आयजीएमसी नागपूर, रत्नागिरी, पालघर, धाराशीव येथील नार्ंसग महाविद्यालयांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. तर बारामती, सांगली, कोल्हापूर येथील नार्ंसग महाविद्यालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
याशिवाय अहिल्या नगर, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, मुंबई, नाशिक, परभणी, सातारा, पालघर, रत्नागिरी, वर्धा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. तसेच भारत-जपान शैक्षणिक आदान प्रदान कार्यक्रमा अंतर्गत रुग्णालय व्यवस्थापन आणि प्रशासन मानवसंसाधन विकास यांच्या क्षमता वृद्धीसाठी तरतूद करण्यात येणार आहे. याशिवाय जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार आणि गोंदिया या सात जिह्यांमध्ये 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय बीएस्सी नार्ंसग विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांसाठी तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध व्हावी म्हणून स्ट्रेन्थनिंग टर्शरी हेल्थ केअर डिलिव्हरी, मेडिकल एज्युकेशन सिस्टीम अॅण्ड नार्ंसग सिस्टीम इन महाराष्ट्र’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
कोकणातील मच्छीमारांसाठी 61 कोटींचा निधी
नाबार्डच्या विकास निधी योजनेतून कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या मच्छीमारांना मासळी उतरविण्याच्या मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी 61 कोटी 24 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. ठाणे ः दिवाळे गाव, रायगड ः बोर्ली मांडला, दिघी, राजपुरी, नांदगाव, सिंधुदुर्ग ः विजयदुर्ग, पालघर ः धाकटी डहाणू, रत्नागिरी ः वेलदूर, पाचू बंदर, बोऱया, चिंबई ‘या’ ठिकाणी मच्छीमारांसाठी सुविधा उभारण्यात येणार आहेत.
मुंबईत आयईएस स्कील टेक विद्यापीठ
मुंबईत इंडियन एज्युकेशन सोसायटीचे (आयईएस) काwशल्य तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यास आज मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. वांद्रे येथे स्थापन करण्यात येणारे हे विद्यापीठ 2026-27 या शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येणार आहे. हे विद्यापीठ कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर खासगी विद्यापीठ म्हणून कार्यरत राहणार आहे.

























































