बंडखोर विशाल पाटलांवर काँग्रस कारवाई करणार; नाना पटोलेंनी दिली माहिती

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपात सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळाली आहे. त्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. विशाल पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा, अशा सूचना त्यांनी काँग्रेसकडून देण्यात आल्या. मात्र, सोमवारी (दि.22) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. तरीही विशाल पाटील यांनी अर्ज मागे घेतलेल नाही. त्यामुळे काँग्रेसकडून विशाल पाटलांवर कारवाई करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई करणार आहोत. कोणीतरी त्यांना फूस लावत आहे. 25 तारखेला आमची बैठक आहे. त्यावेळी त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मतविभाजन करणारी कंपनी होती, तिचे आता काम संपलेले आहे. लोकांना त्यांच्याबद्दल समजलेले आहे. लोकांनी आता मतविभानज करायचे नाही. जनता आता महाविकास आघाडीसोबत राहणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विशाल पाटलांना निवडणुकीसाठी लिफापा हे चिन्ह देण्यात आले आहे. विशाल पाटलांनी भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर टीका केली. आमची लढाई दंडूकशाही करणाऱ्या संजयकाका पाटील यांच्या विरोधात असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.