Breaking – मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात गोळीबार, तीन जण जखमी

मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरात गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. चुनाभट्टी येथील आझाद गल्लीत गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या तिघांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी दिवसाढवळ्या हा गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.