Lok Sabha Election 2024- भाजपकडून वरुण गांधींचा पत्ता कट; अपक्ष लढण्याची शक्यता

उत्तर प्रदेशातील पीलीभीत मतदारसंघ चर्चेत होता. या ठिकाणचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पाचवी यादी जाहीर करत पीलीभीतबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या ठिकाणी भाजपने वरुण गांधी यांचा पत्ता कट केला असून जितीन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वरुण गांधी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

भाजपने जाहीर केलेल्या पाचव्या उमेदवारी यादीत सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पीलीभीतमधून वरुण गांधी यांचा पत्ता कट करत जितिन प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने मनेका गांधींना उमेदवारी दिली गेली आहे मात्र वरुण गांधींना तिकिट देण्यात आलेले नाही. वरुण गांधी सातत्याने स्वपक्षावरच टीका करत होते. भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत असल्याने भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात येणार नाही, अशी चर्चा होती. त्याप्रमाणे भाजपने वरुण गांधी यांचे तिकीट कापत जितीन प्रसाद यांना उेदवारी दिली आहे.

उत्तर प्रदेशातील पीलीभीत हा चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. येथे पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. वरुण गांधी यांनी चार उमेदवारी अर्ज मागवल्याने ते निवडणुकीत उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशई चर्चा होती. आता भाजपने त्यांचे तिकीट कापल्याने ते अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मतदारसंघात त्यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याआधी मनेका गांधी यांनी दोन दशके या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 2009 मध्ये पहिल्यांदा वरुण गांधी या मतदारसंगातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.