हिंदुस्थानी अवकाश संशोधनाची ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून प्रशंसा

अंतराळ संशोधनातील क्रांतिकारी संशोधन आणि उपक्रमांनी या विश्वाच्या पसाऱयात पृथ्वीचे नाव अजरामर करण्यासाठी हिंदुस्थान बिनीची भूमिका बजावण्यासाठी सिद्ध झाला आहे, अशा शब्दांत हिंदुस्थानच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ संशोधन कार्यक्रमाची ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने वाखाणणी केली आहे. हिंदुस्थानात सध्या झपाटय़ाने विस्तारणारे अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्ट अप्स क्षेत्र लक्षात घेता हा देश चीनला तुल्यबळ ठरू शकतो, असेही ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने लेखात म्हटले आहे.