लव्ह मॅरेजचा असा भयंकर अंत… पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या

भोजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवविवाहीतेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून मृतदेह घराच्या अंगणात पुरण्यात आला. एवढेच नाही तर पुरावे लपविण्यासाठी तेथे रोपे लावण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिथुन गिरी असे मृत तरुणाचे नाव आहे. आगियान बाजार पोलीस स्टेशन परिसरातील तार गावात राहणारा 26 वर्षीय मिथुन हरियाणातील गुरुग्राममध्ये ट्रक चालकाचे काम करतो.त्याने चार महिन्यांपूर्वी इटम्हा गावातील रहिवासी नेहा देवी सोबत प्रेमविवाह केला होता. मृत तरुणाचे वडिल कमलेश गिरी यांनी सांगितले की, मिथुन गुरुग्राम येथून दोन महिन्यांपूर्वी घरी आला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी इटम्हा येथे आपल्या सासरी गेला होता.पण त्यानंतर त्याच्याशी काहीच संपर्क झाला नाही. आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याचा फोन सतत स्विच ऑफ येत होता. त्यानंतर त्याच्या मेहूण्याला फोन केला मात्र त्यानेही फोन उचलला नाही आणि काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. चौकशी केली असता कळले की सुनेने आपल्या प्रियकरासोबत मिळून मिथुनची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह अंगणात पुरण्यात आला. पोलिसांना माहिती मिळताच आम्ही सर्वजण तेथे पोहोचलो आणि मिथुनचा मृतदेह जमिनीत पुरल्याचे दिसले.त्यानंतर घराची जमीन खोदून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

डीएसपी राहुल कुमार सिंह यांनी सांगितले की, मिथुनच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिने घरगुती वादातून सोमवारी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर संतापाच्या भरात मिथुनने घराचा दरवाजा बंद करून गळफास लावून घेतला. त्यानंतर घाबरल्याने तिने गावातील बबलू पासवानला बोलावून त्याच्या मदतीने पतीचा मृतदेह अंगणात पुरला. जेणेकरुन कोणाला याची माहिती होऊ नये आणि त्यावर रोपंही लावली. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.