निलेश लंके यांना नगर शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देणार – संभाजी कदम

सध्याचे सरकार हे घोषणाबाज असून, त्यांनी दिलेली आश्वासने या सरकारने पूर्ण केली नाहीत. महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न अशा प्रत्येक आघाडीवर हे सरकार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या सरकारला आता जनसामान्यच या निवडणुकीत जागा दाखवून देणार आहे. महाआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेले कार्य सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे जनसामान्य ते त्यांच्या पाठिशी उभे आहेत. गेल्या काही दिवसापासून प्रचारात मोठी आघाडी घेतली असून, नागरिकांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्याच्या खासदारांनी नगरमध्ये कोणत्याही प्रकारची कामे केली नसून, नगरमधील प्रश्नांवर बोलण्याऐवजी इतरत्र लक्ष वेधून जनतेची दिशाभुल करत आहेत. परंतु जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाहीत. मोठ्या बहुमतांनी निलेश लंके हे निवडून येतील, असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

प्रभाग क्र.12 मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ परिसरातून फेरी काढण्यात आली. याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर सुरेखा कदम, माजी नगरसेविका मंगल लोखंडे, दत्ता कावरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, गिरिष जाधव, शाम नळकांडे, अरुणा गोयल, अशोकराव बाबर, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, सुरेश तिवारी, दिलदारसिंग बीर, परेश लोखंडे, योगिराज गाडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, अरुण झेंडे, श्रीकांत चेमटे, मुन्ना भिंगारदिवे आदि उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब बोराटे म्हणाले, नगर शहरातून निलेश लंके यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्रित प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीच्या मागे जनमत असल्याने निलेश लंके हे विजय होणार आहेत, त्यात नगर शहराचा मोठा वाटा असेल. मतदारांनी ही स्वत: निवडणूक हाती घेतली असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे बेताल व्यक्त करत आहे. त्यांचा पराभव जनताच करेल, असे सांगितले.

ही फेरी श्री विशाल गणेश मंदिर, ढोर गल्ली, वसंत टॉकीज चौक, कौठीची तालिम, पंचपीर चावडी, फुलसौंदर चौक, आशा टॉकीज चौक, जुना बाजार, बंगाल चौकी मार्गावरुन काढण्यात आली.