ओमायक्रॉनच्या फैलावाच्या वेगाने संशोधकही धास्तावले; यापासून बचाव करणे कठीण

ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकोपाने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. तेथील वायरोलॉजिस्ट वोल्फगैंग प्रीजर यांनी याचा शोध लावला. त्यांनी या व्हेरिएंटच्या वाढत्या फैलावाबाबत चिंता व्यक्त केली आहे. या व्हेरिएंटमुळे जगात मोठ्या प्रमाणात याचे संक्रमण होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या व्हेरिएंटपासून बचाव करणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रोफेसर वोल्फगैंग प्रीजर यांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. हा नवा व्हेरिएंट झपाट्याने फैलावत असून त्यांची संक्रमणाची क्षमता खूप जास्त आहे. त्यापासून याची लागण होण्यापासून बचाव करणे खूप कठीण आहे. त्यामुळे जगात मोठ्या प्रमाणात याची लागण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दक्षइण आफ्रिकेत ओमायक्रॉन नियंत्रणात येत असला तरी याचा धोका कायम आहे. आधीच्या व्हेरिएंटपेक्षा हा कमी धोकादायक असला तरी आता त्यामुळे मृत्यूही होत आहेत. तसेच त्याचा फैलावही झपाट्याने होत आहे. हे चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण नोव्हेंबरमध्ये आढळला होता. त्यानंतर आता याच्या रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. इतर व्हेरिएंटपेक्षा हा कमी धोकादायक असला तरी वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य सेवेवर परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत याची लागण झालेल्यांमध्ये गंभईर लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे हा सर्दी खोकल्यासारखा सामान्य व्हायरस होण्याची शक्यता आहे. ही दिलासा देणारी बाब असल्याचे प्रीजर यांनी सांगितले. मात्र, याचा संक्रमणाचा वेग जास्त असल्याचे त्यापासून बचाव करणे कठीण असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ओमायक्रॉनचा वेगाने फैलाव होत असल्याचे याच्या रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. मात्र, याचा फैलाव लक्षात घेता रुग्णालयात दाखल होणाऱ्याची संख्या कमी असल्याचेही त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेत याच्या संक्रमणाने उच्चांक गाठून आता रुग्णसंख्या कमी होत आहे. दक्षिण आफ्रिकेत अनेकांनी कोरोनाशी मुकाबला केला आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या होत्या. त्यामुळे येथे हा लवकर नियंत्रणात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अजूनही धोका कायम असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.