पुनम पांडे हिचे कर्करोगाने निधन

मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे (32) हिचे गर्भाशयाच्या कर्करोगामुळे कानपूरमध्ये निधन झाले आहे. या वृत्ताला तिची मॅनेजर निकिता शर्मा यांनी दुजोरा दिला आहे.

पूनमच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर शुक्रवारी सकाळी एक पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये लिहिलेय, ‘आजची सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे. आम्हाला कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे आम्ही पूनमला गमावले आहे.’ दरम्यान, पूनमच्या निधनाच्या वृत्तामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पूनमने केलेला हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना? कदाचित तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले असावे अशा प्रतिक्रियादेखील सोशल मीडियामध्ये उमटत आहेत.