“मणिपूरच्या हिंसाचाराची युरोपियन संसदेतही चर्चा, मात्र मोदी अद्याप एक शब्दही बोलले नाहीत”, राहुल गांधींची टीका

rahul-gandhi-new

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, ‘मणिपूरच्या परिस्थितीवर युरोपियन संसदेत चर्चा झाली आणि त्याच्या निषेधार्थ ठराव आणण्यात आला, मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरबाबत आजवर एक शब्दही उच्चारलेला नाही.’

राहुल गांधींनी याबाबत ट्विट करून म्हटलं की, ‘मणिपूर जळत आहे. युरोपच्या संसदेत हिंदुस्थानच्या अंतर्गत विषयावर चर्चा झाली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलले नाहीत. दरम्यान, राफेलने त्यांना बॅस्टिल डे परेडचे तिकीट मिळवून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाला (बॅस्टिल डे परेड) पाहुणे म्हणून हजेरी लावली. फ्रान्स सरकारने पंतप्रधान मोदींना निमंत्रित केले होते.

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात युरोपच्या संसदेत प्रस्ताव आणला गेला. यावरून गांधी यांनी मोदींवर टीका केली.