पबचालक, बारमालकांकडून पोलिसांना हप्ते; थेट यादी घेऊन रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंची उत्पादन शुक्ल विभागावर धडक

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. बड्या बापाच्या मुलाने पोर्शे गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्यापासून आरोपीला मुलाला वाचवण्यासाठी कुणी-कुणी इमान विकले हे दररोज समोर येत आहे. आमदार, पोलीस आणि डॉक्टरही धनिकपुत्रासाठी ‘सेवेकरी’ झाल्याचे निदर्शनास आले असून काहींवर कारवाईही झाली आहे. या अपघातानंतर पुण्यातील पब, बारचा मुद्दाही चांगलाच गाजत असून आज शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट उत्पादन शुक्ल विभागावर धडक देत कोणत्या पब आणि बारमालकाकडून पोलिसांना किती हप्ता मिळतो याची यादीच वाचून दाखवली आहे. या संदर्भात धंगेकर यांनी एक ट्विटही केले असून यात त्यांनी कोणत्या पबचालक, बारमालकाकडून किती हप्ता मिळतो याचा पाढा वाचला आहे.

आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला. पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या अजून पर्यंत शुल्काचे सुपरटेंडंट घरण सिंग राजपूत यांना साधारण महिन्याचे प्रत्येक हॉटेल मधून पैशाचे पाकीट पुरवले जाते त्याची यादीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वाचून दाखवली आहे.

Pune porsche accident : अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबीनमध्ये फेकले; ससूनच्या डॉक्टरांची आर्थिक ‘सेटिंग’ उघड

विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, भुगांव भुकुम, बाणेर, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड, लोणावळा आदी. भागातील कलेक्शन करणारे कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खासगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊनी शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत पण वसुली करतात, असा घणाघाती आरोप धंगेकर यांनी ट्विटद्वारे केला.

विमाननगर परिसरातील लेट नाईट व रुफ टॉपवाले

  • द माफिया – 1 लाख
  • एजंट जॅक्स प्रत्येक आऊटलेटसाठी 50 हजार, असे एकूण 12 आऊटलेट
  • बॉलेर – 2 लाख महिना
  • 2 bhk lakh. (राजाबहादूर मिल्स)
  • दिमोरा 1 lakh (राजाबहादूर मिल्स)
  • मिलर 1 लाख (राजाबहादूर मिल्स)
  • TTF rooftop – 50 हजार (बाणेर)
  • बँक स्टेज – 90 हजार (Vimanngr. & Moh. Wadi)
  • ठीखणा 1.5 लाख 3 आऊटलेटचे
  • स्काय स्टोरी – 50 हजार
  • जिमी दा ढाबा – 50 हजार ( पाषाण)
  • टोनी दा ढाबा – 50 हजार
  • आयरीश – 40 हजार
  • टल्ली टुन्स – 50 हजार
  • ऍटमोस्ट फेयर – 60 हजार
  • रुड लॉज – 60 हजार
  • द टिप्सी हॉर्स – 60 हजार
  • रेन फ़ॉरेस्ट रेस्टो बार – 50 हजार
  • 24K-बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड – 1.5 लाख
  • कॅफे सीओ 2 (cafe CO2) हॉटेल भूकंम 1 लाख महिना
  • कोको रिको हॉटेल भूगाव 75 हजार महिना
  • स्मोकी बिच हॉटेल भुकुंम 75 हजार महिना
  • सरोवर हॉटेल भूगाव – 1 लाख महिना
  • जिप्सी हॉटेल भुकुंम 50 हजार महिना
  • 7 : साईबा हॉटेल 30 हजार
  • या सह वाईन्स शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे 18 हॉटेल बार, 2 वाईन्स शॉप, 3 बिअर शॉपी व इतर ढाबे (होलसेल लिकर) 3.5 लाख रुपये.
  • बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार, 30 वाईन्स शॉप, 35 बिअर शॉपी – 5.5 लाख (होलसेल लिकर)
  • कैलास जगताप व इतर यांचे 11 बार, 8 वाईन्स शॉप, 9 बिअर शॉपी – 2.5 लाख (होलसेल लिकर)
  • कोरेगाव पार्क व कल्याणीनगर, बालेवाडी हायस्ट्रीट, कोंढवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर, या भागातील सर्वच लेट नाईट चालणारे पब, रुफटॉप रेस्टॉरंटला प्रत्येकी कमीत कमी 50 हजार महिन्याला (प्रत्येकी)
  • वाईन्स शॉपचा माल ठेवणारे परमिट रुमला कमीत कमी महिन्याला – 20 हजार (प्रत्येकी)
  • रेस्टॉरंट व ढाबेच्या ठिकाणी अवैध दारू विक्रीसाठी – महिन्याला कमीत कमी 25 ते 50 (प्रत्येकी)
  • शाम जगवानी व इतर यांचे 11 वाईन्स शॉप मधून होलसेल दारू विक्री व ऑनलाईन होम डिलेव्हरी करिता महिन्याला 2.5 लाख.
  • एक्साइज division 12 – प्रत्येक 50 हजार – 6 लाख रूपये.
  • दारुचे होलेसेलर 32 – 50 हजार प्रत्येकी महिना.
  • साखर कारखाने 18 ते 20 कारखाने – 50 हजार महिना
  • नवीन परमिटरूमबार – 12 (ग्रामीण)
  • नवीन परमिटबार – 12 ते 15 (महानगर पालिका)
  • बिअर शॉपी (ग्रामीण)- 3
  • बिअर शॉपी (शहर)- 5

स्वतः एजेंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतो, आणि सर्व काम कॉन्स्टेबल सागर धुर्वे व तात्या शिंदे हे दोन व्यक्ती फूड लायसन्ससह सर्व परवाने काढतात. ही माहिती त्रयस्त एक्साईजच्या स्टाफनी दिलेली आहे. 78 लाख रूपये महिना कलेक्शन असून 2 वर्षात नवीन लायसेन्स केलं त्याचे 2.5 कोटी रुपये. अशाप्रकारे लाखो रुपयांचा हप्ता पोलीस प्रशासन या पब आणि बार मालकांकडून गोळा करत आहेत. हे सगळे प्रकरण अत्यंत गंभीर असून पुण्याच्या पोलीस प्रशासनाला लागलेली कीड व पुण्याच्या संस्कृतीचा मांडलेला खेळ अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद आहे, असा घणाघात धंगेकर यांनी केला.

सुषमा अंधारे आक्रमक

यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेही आक्रमक झाल्या.महाराष्ट्रातील तरुणाईच्या भवितव्याशी खेळू नका. तुम्ही तरुणाईला पोखरून काढत आहात. हा ड्रग्स कुठून सापडतो. अजय तावरेंना ललित पाटील प्रकरणातच अटक झाली पाहिजे होती. का त्यांना सोडलं जातंय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला.