दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेलाही रोहित शर्मा मुकणार

टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे लढतींच्या मालिकेलाही मुकणार आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानच्या वन डे मालिकेच्या संघाच्या नेतृत्व दुसरा सलामीवीर के. एल. राहुल करणार आहे. या मालिकेसाठीचा हिंदुस्थानी संघ शुक्रवारी बीसीसीआयने घोषित केला. या संघाचा उपकर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठीचा हिंदुस्थानी संघ ः के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), युजवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.