चर्चगेट मेट्रो स्थानक लिफ्टमध्ये सहा  प्रवासी अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुयारी मेट्रो मार्गिकेवरील चर्चगेट स्थानकातील लिफ्टमध्ये मंगळवारी दुपारी अचानक तांत्रिक बिघाड होऊन आतमध्ये सहा प्रवासी अडकले. जवळपास 10 मिनिटे प्रवाशांना आतच अडकून राहावे लागल्याने त्यांची प्रचंड घाबरगुंडी उडाली. नंतर तांत्रिक टीम आणि बचाव पथकाने धाव घेत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेने भुयारी मार्गिकेतील प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवारी दुपारी चर्चगेट मेट्रो स्थानकातील पाच क्रमांकाची लिफ्ट बंद पडली. ही लिफ्ट मेट्रो मार्गिकेच्या प्लॅटफॉर्मचा तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या मधील भागात अडकली होती.