Stock Market Update – शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ, सेन्सेक्स ‘शिखरावर’, 65 हजारांचा टप्पा ओलांडला

देशांतर्गत शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्सने नवीन उच्चांक गाठला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी दिसून आल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये सेन्सेक्स शिखरावर पोहोचला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 65 हजारांचा पल्ला पार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली.

सोमवारी बाजार सुरू होताच जोरदार खरेदी पाहायला मिळाली. यामुळे सेन्सेक्स 400 अंक वाढला आणि थेट 65 हजारांच्या पार पोहोचला. दुसरीकडे निफ्टीही 19250 पार आणि बँक निफ्टी 45 हजारांच्या पार पोहोचला आहे. आज सुरुवातीपासून ऑटो, बँकिंग सेक्टरमध्ये तुफान वाढ पाहायला मिळाली.

एमएडएम, अल्ट्राटेक सीमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी आणि आयशर मोटर्सचे शेअर सर्वाधिक वाढले, तर मारुती सुझुकी, पॉवर ग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प आणि एशियन पेंट्समध्ये घसरण पाहायला मिळाली.