…तर 15 दिवसांत दहा जम्बो कोविड सेंटर सुरू करणार ! पालिका सतर्क, आरोग्य सुविधा सज्ज

मुंबईत सद्यस्थितीत फक्त 50 सक्रिय कोरोना रुग्ण असले तरी परदेशात वाढलेला कोरोना पाहता पालिका सतर्क झाली आहे. सद्यस्थितीत दोन हजार सामान्य बेड, 772 आयसीयू, 853 व्हेंटिलेटर, चार हजार डॉक्टर, साडेचार हजार नर्स आणि 4500 आरोग्य कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. तर गरज लागल्यास केवळ 15 दिवसांतच सर्व दहा जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची पालिकेची क्षमता असल्याची माहिती आज अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

परदेशात काही ठिकाणी थैमान घातलेल्या कोरोना व्हेरिएंट ‘एफबी-7’ने मुंबईतही शिरकाव केल्याने पालिकेने सतर्कता दाखवत यंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कोरोना वॉर्ड वॉर रूम, रुग्णवाहिका, औषधे, पीपीई कीट, मास्कही सुविधा करण्यात आली आहे. यामध्ये कोरोनाच्या पहिल्या दोन भयंकर लाटांमध्ये उपयुक्त ठरलेले जम्बो कोविड सेंटर सद्यस्थितीत रुग्णच दाखल नसल्याने बंद करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणच्या आरोग्य सुविधा एकत्र करून अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील जागेत सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास या सुविधांची गरज भासल्यात तातडीने उपलब्ध होतील, अशी पालिकेची व्यवस्था आहे.

दहा जम्बो कोकिड सेंटरची बेडसंख्या

दहिसर चेकनाका, कांदरपाडा                     एकूण 700 बेड

मालाड जम्बो कोकिड सेंटर                        2200 बेड

नेस्को गोरेगाक फेज 1                            2221 बेड

नेस्को गोरगाक फेज 2                           1500 बेड

बीकेसी कोकिड सेंटर                               2328 बेड

कांजुरमार्ग कोकिड सेंटर                            2000 बेड

शीक जम्बो कोकिड सेंटर                           1500 बेड

आरसी भायखळा सेंटर                             1000 बेड

आरसी मुलुंड जम्बो सेंटर                           1708 बेड

सेक्हन हिल्स रुग्णालय अंधेरी                     1850 बेड

 ऑक्सिजन सज्जता

कोरोनाच्या दुसऱया लाटेत दररोज 230 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागत होती, मात्र पालिकेने आता स्वतःची क्षमता वाढवली आहे. सद्यस्थितीत पालिकेकडे चार हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. पालिका दररोज 1150 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करू शकते.