कोरोना लसीचं संशोधन करणाऱ्या दोन शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर

जगातील सर्वाधित प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना काळात संशोधन करणाऱ्या कॅटालिन कारिको आणि ड्रू विसमॅन या दोन शास्त्रज्ञांना वैद्यकीय विभागाचे नोबेल विभागून देण्यात आलं आहे.

कोरोना लसीच्या निर्मितीमध्ये या दोघांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. प्राध्यापक कॅटलिन कारिको हे पॅरेलमन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये न्यूरोसर्जरी विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. तर प्राध्यापक ड्रू विसमॅन हे त्याच संस्थेत वॅक्सिन संशोधनाचे प्राध्यापक आहेत. या दोघांनीही न्यूक्लिओसाईड बेस मॉडिफिकेशन्समध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या त्याच संशोधनामुळे एमआरएनए लसीची निर्मिती होऊ शकली.

याच लसीच्या साहाय्याने जगाने कोरोनाविरुद्धचा लढा यशस्वी करून दाखवला. त्यांच्या या कार्यासाठी कृतज्ञता म्हणून नोबेल पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.