जुहूमध्ये इमारतीला आग लागून सहा ठार, आठ होरपळले

सामना प्रतिनिधी । मुंबई

जुहू येथील एका बांधकाम सुरू असलेल्या 13 मजली इमारतीच्या तळमजल्यावर आग लागून सहाजण ठार तर आठजण होरपळल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. जुहूच्या कैफी आझमी पार्कच्या समोरील प्रार्थना या तेरा मजली इमारतीच्या तळमजल्यावरील झोपडय़ांना रात्री दहाच्या सुमारास गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन मोठी आग लागली. त्यात सहा मजूर होरपळून ठार झाले असून त्यात दोन महिला आणि एका मुलाचाही समावेश आहे. या आगीत होरपळलेल्यांना बाहेर काढण्यात आले असून जखमींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.