वडोदरा येथील नदीत बोट उलटली, 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा बुडून मृत्यू

गुजरातमधील वडोदरा शहरात हारनी तलावात एक बोट उलटून 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या बोटीची क्षमता 16 ची असताना त्यात 27 जण प्रवास करत होते. तसेच एकाही प्रवाशाने लाईफ जॅकेट देखील घातले नव्हते. हे सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेचे असून ते पिकनिक साठी त्या परिसरात आले होते.