
मध्य प्रदेशात मागील वर्षीच्या जानेवारीपासून एप्रिल 2026 पर्यंत म्हणजेच एकूण 14 महिन्यांत 149 बिबटय़ांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे. आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अजय दुबे यांनी यासंबंधी माहिती अधिकारांतर्गत काही प्रश्न विचारले होते. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये हिंदुस्थानात बिबटय़ांची स्थिती 2022 रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशात बिबटय़ांची संख्या सर्वाधिक 3 हजार 907 इतकी आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचा नंबर लागतो. जानेवारी 2025 पासून सुरू होणाऱया 14 महिन्यांत मध्य प्रदेशात 149 बिबटय़ांचा मृत्यू झाला आहे. यात 31 टक्के मृत्यू हे रस्ते अपघातात झाले आहेत, तर 19 टक्के मृत्यू हे महामार्गावर झाले आहेत. 24 टक्के मृत्यू हे वय वाढल्याने आणि आजारामुळे झाले असून 21 टक्के मृत्यू हे वन्य जीव यांच्यात झालेल्या संघर्षामुळे झाले आहेत, असे माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. 14 टक्के मृत्यू हे अवैध शिकारीअंतर्गत झाले.

























































