महिलांना 33 टक्के आरक्षण,मंत्रिमंडळाची मंजुरी विशेष अधिवेशनात विधेयक मांडणार

गेली 27 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिला आरक्षण विधेयकाला आज अखेर पेंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. 21 सप्टेंबरला हे विधेयक संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. महिला आरक्षणाला भाजप, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे विधेयक मंजूर होईल. त्यामुळे लोकसभा, विधानसभांमध्ये 33 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत.

मंत्रिमंडळाची बैठक दीड तास चालली. बैठकीनंतर महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती देणारे ट्विट राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले. मात्र तासाभरातच त्यांनी हे ट्विट डीलीट केले. रात्री उशिरापर्यंत पेंद्राकडून या विधेयकाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

विधेयकामुळे काय होणार

महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभा
आणि राज्यांच्या विधानसभेत 33 टक्के जागा महिलांसाठी असतील म्हणजे 33 टक्के खासदार, आमदार महिला असतील. तसेच राज्यसभा आणि विधान परिषदेत महिलांना 33 टक्के जागा आरक्षित असणार आहेत.