
>> नीलिमा प्रधान
मेष – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
शुक्र राश्यांतर, मंगळ शनि युती. साडेसाती सुरू आहे. प्रत्येक दिवस महत्त्वाचा. कुणालाही कमी लेखू नका. कामे लवकर करून घेता येतील. नोकरीधंद्यात वाढ होईल. योग्य वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 19, 21
वृषभ – कामाचा उत्साह वाढेल
शुक्र राश्यांतर बुधशिनि युती. नव्या कार्याचा आरंभ होईल. कामाचा उत्साह व आतमविश्वास वाढेल. परिचयाने नवा मार्ग मिळेल. तुमच्या क्षेत्रात पुढे जाल. नोकरीधंद्यात तणाव टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. शुभ दि. 22, 23
मिथुन – कामाचा व्याप वाढेल
शुक्र राश्यांतर, सूर्य चंद्र लाभयोग. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. अनोळखी व्यक्तीपासून सावध रहा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल तरीही प्रभाव राहील.पोटाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकाऱयांना दुखवू नका. शुभ दि. 24, 25
कर्क – नवे काम मिळवा
शुक्र राश्यांतर, बुध शनि युती, कला-साहित्याला प्रेरणादायक कालावधी. नविन परिचयात सावध रहा. नोकरीधंद्यात प्रभाव दाखवता येईल. नवे काम मिळवा. कर्ज वसूली होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आश्वासन मिळेल. शुभ दि. 19, 20
सिंह – प्रकृतीची काळजी घ्या
वृषभेत शुक्र राश्यांतर, मंगळ शनि युती. सप्ताहाच्या सुरूवातीला महत्त्वाची कामे करा. वाहनाचा वेग कमी ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कोणतेही वक्तव्य जपून करा. शुभ दि. 19, 22
कन्या – चौफेर यश मिळेल
शुक्र राश्यांतर, बुध मंगळ युती. कोणतीही चर्चा अचानक वादाकडे जाईल. कठोर शब्द वापरू नका. कायदा सर्वत्र पाळा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. वाहनापासून धोका संभवतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. शुभ दि. 21, 23
तूळ – अहंकारयुक्त भाषा नको
शुक्र राश्यांतर, मंगळ, शनि युती. क्षुल्लक कारणाने सुद्धा तणाव होईल. प्रकृतीची काळजी घ्या. अहंकाराची भाषा नको. संयम ठेवा. यश मिळवा. नोकरीत व्याप राहील. शब्द जपून वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया वाढतील. शुभ दि. 22, 23
वृश्चिक – हिशेबात सतर्क रहा
शुक्र राश्यांतर, बुध, मंगळ युती. क्षेत्र कोणतेही असो अट्टहास नुकसानकारक. गोड बोलून तुमचे मत मांडा. हिशेबात सतर्क रहा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्णय ठरवा. आरोप वाढतील. कराराची घाई नको. शुभ दि. 24, 25
धनु – व्यवहारात फसगत होईल
शुक्र राश्यांतर, मंगळ, शनि युती. मनावर दडपण येईल. तुमच्या चांगल्या वागण्याचा गैरफायदा घेतला जाईल. जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमज होईल. व्यवहारात फसगत होईल. उतावळेपणा नको. राजकीय क्षेत्रात अस्थिरता वाढेल. शुभ दि. 21, 22
मकर – उतावळेपणा नको
शुक्र राश्यांतर, बुध, मंगळ युती. उत्साह वाढेल. परंतु उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊ नका. नोकरीत अहंकार नको. धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संतापजनक वक्तव्य टाळा. तटस्थ रहा. शुभ दि. 20, 24
कुंभ – अनाठायी खर्च टाळा
शुक्र राश्यांतर, बुध, शनि युती. अनाठायी खर्च टाळा. महत्त्वाच्या वस्तू जपा. नोकरीत काम वाढेल. नविन परिचयापासून सावध रहा. कायद्याच्या विरोधात बोलणे वादाला कारण ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शुभ दि. 19, 22
मीन – वेग नियंत्रणात ठेवा
शुक्र राश्यांतर, बुध, मंगळ युती. स्पष्ट बोलणे त्रासदायक ठरेल. तुमचा मुद्दा पटवण्याचा प्रयत्न करा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीत वर्चस्व वाढेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. शुभ दि. 19, 20
























































