
पोंग्यांग, दि. 19 (वृत्तसंस्था) – उत्तर कोरियाने रविवारी समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. किम जोंग उन यांच्या आदेशाने एकापाठोपाठ एक अनेक बॅलिस्टिक मिसाईल डागण्यात आली. यामुळे दक्षिण कोरिया, जपान या दोन देशांमध्ये एकच खळबळ उडाली असून अलर्ट मोडवर गेले आहेत.
किम जोंग उन यांनी गेल्या काही दिवसांत चौथ्यांदा मिसाईलच्या चाचण्या केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर जपान सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. जपान सरकारने आपली सर्वोच्च स्तरावरील संकट व्यवस्थापन प्रणाली सक्रिय केली आहे. पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी पहाटेच्या वेळी वाढलेल्या तणावावर एक्सवर माहिती दिली.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, आज सकाळी 06ः00 वाजता उत्तर कोरियाकडून अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली असावीत. क्षेपणास्त्रे असू शकणाऱ्या वस्तू जपानच्या विशेष आर्थिक
क्षेत्राबाहेर आधीच पडल्या आहेत. सध्या जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यासंबंधी अधिक माहिती घेत आहेत.


























































