आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम, ’मातोश्री’ निवासस्थानी शनिवारी दुपारी 12.30 ते 4 या वेळेत शुभेच्छा स्वीकारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा शनिवार, 13 जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्त मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबद्दल आभार मानतानाच शनिवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी दुपारी 12.30 ते 4 वाजेपर्यंत  शुभेच्छांचा स्वीकार करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक आणि युवासैनिक ‘मातोश्री’ निवासस्थानी येतात. ही बाब लक्षात घेत त्यांनी आज आवाहन केले. ‘मातोश्री’ निवासस्थानी मी आपणा सर्वांना भेटण्यासाठी, तुमच्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी शनिवारी दुपारी 12.30 ते 4 या वेळेत उपलब्ध असेन,’ असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.