60 कोटी ‘खड्ड्यात’स्थायी समितीकडे मंजुरीसाठी 16 प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ahilyanagar-roads-full-of-potholes-citizens-outraged-ahead-of-ganesh-festival

महापालिका खड्डे बुजवण्यासाठी तब्बल 60.11 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. यामध्ये सातही परिमंडळातील रस्त्यांच्या डागडुजीचे काम होणार असून याबाबतचे तब्बल 16 प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

पालिका खड्डे बुजवण्याकडे विशेष लक्ष देत आहे. मात्र तरीदेखील खड्डय़ांमुळे मनस्ताप होत असल्याने या प्रस्तावांवर विरोधकांकडून जोरदार आक्षेप घेण्याची शक्यता आहे. या प्रस्तावांमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी 19.17 कोटींचा खर्च आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील खड्डे  बुजविण्यासाठी 18.88 कोटींचा खर्च  करण्याबाबतचे 38.05 कोटी रुपये खर्चाचे दोन स्वतंत्र प्रस्ताव मंजुरीसाठी असणार आहेत. परिमंडळ 1 ते 7 मधील 9 मीटर  रुंदीपेक्षा कमी आणि जास्त रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी 22.05 कोटींचा खर्च करण्याबाबतचे 14 प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत.