
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांनी साकीनाका येथे सॉस उत्पादन करणाऱ्या दुकानावर तर धारावी येथे नियमबाह्यपणे एनर्जी ड्रिंक बनविणाऱ्या आस्थापनेवर कारवाई केली.
साकीनाका येथे मे. रती एन्टरप्रायझेस या दुकानात नियमबाह्यपणे सॉसचे उत्पादन केले जात असल्याची माहिती मिळताच एफडीएच्या पथकाने त्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी तेथे संशयास्पद कारभार आढळून आल्याने चिली व सोया सॉसचा 2 हजार 510 लिटर साठा हस्तगत करण्यात आला, तर धारावी येथे मे. रियांश एन्टरप्रायझेस या दुकानावर छापा टाकून एक लाख 19 हजार किमतीचा एनर्जी ड्रिंकचा साठा जप्त करण्यात आला.































































