Photo – नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘रामरक्षा महाआरती’ आणि सामूहिक स्तोत्र पठण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेल्या लुटीच्या निषेधार्थ शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज नागपुरात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. रामनगरातील श्रीराम मंदिराजवळ झालेल्या या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली. यावेळी रामरक्षा पठण, हनुमान चालिसा आणि महाआरतीने नागपूरनगरी दुमदुमली. या आंदोलनासाठी रामभक्त आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले.