पुरंदर विमानतळासाठी निम्म्यावर भूसंपादन पूर्ण – मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नियोजित पुरंदर विमानतळासाठी 50 टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले आहे. देशाच्या इतिहासात इतक्या वेगाने भूसंपादन होण्याचा हा विक्रम आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे-शिरुर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, हडपसर-यवत या तीन उन्नत मार्गांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, पुरंदर विमानतळाशी कनेक्टिव्हिटी वाढविण्यावरही भर असून, दिवेघाटामध्ये दुहेरी बोगदा तयार करून त्यातून रस्ता व मेट्रो नेल्यास पुरंदर विमानतळावर पोहोचण्याचा वेळ कमी होईल व वनाअडथळा प्रवास शक्य होईल. यादृष्टीने विचार सुरू आहे. 173 किलोमीटरचा बाह्य व 86 किलोमीटरचा अंतर्गत रिंग रोड दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे,आमदार हेमंत रासने उपस्थित होते.