असं झालं तर…सातबारा उताऱ्यावर नाव चुकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर तुम्ही जमीन खरेदी केली असेल किंवा वारसा हक्काने तुमच्या नावावर करायची असेल, तर सर्वात आधी तलाठ्याकडे फेरफार नोंदीसाठी (Mutation) अर्ज करावा लागतो.

खरेदीखत (Sale Deed), मृत्युपत्र, सर्व कायदेशीर वारसांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि वधारलेल्या शुल्काची पावती ही कागदपत्रे लागतात. तलाठी यावर आक्षेप मागवतो.

मंडळाधिकाऱयाच्या मंजुरीने नवीन नाव उताऱयावर लागते. उताऱ्यावर चुकीचे नाव असल्यास किंवा क्षेत्रफळात तफावत असल्यास, तलाठय़ाकडे /तहसील कार्यालयात अर्ज करा.

‘महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155’ अंतर्गत दुरुस्तीसाठी अर्ज करता येतो. तुम्ही घरबसल्या महाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळावर जुने, नवीन उतारे पाहू शकता.

डिजिटल स्वाक्षरीकृत सातबारा काढण्यासाठी डिजिटल सातबारा पोर्टलला भेट द्या. मोबाईलद्वारेदेखील तुम्ही 1980 ते 2025 पर्यंतचे जुने उतारे मिळवू शकता.