चंदिगडमध्ये मोदींचे पोस्टर फाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर फाडण्यात आले. सर्व पोस्टर्स एकाच पद्धतीने फाडण्यात आली होती. ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो होता, त्या ठिकाणी फोटोतील मानेखालील भाग फाडण्यात आला होता. या प्रकरणी भाजपने यावर तीव्र संताप व्यक्त करत हे काही समाजकंटकांचे कृत्य आहे, असे म्हटले आहे.