
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत एक नवा इतिहास रचला आहे. हिंदुस्थानी ज्युडोपटू अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी ज्युडो या क्रीडा प्रकारात हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात ज्युदोमध्ये हिंदुस्थानने सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ असून, यासह तब्बल ९२ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपला आहे.



























































