
बिस्किट आणि ५० रुपये देण्याचे आमिष दाखवून चार नराधमांनी १३ वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा आरोपींना अटक करण्यात आली आहे. दाखल करण्यात आला असून चारही पंधरा दिवसांपूर्वीही या मुलीवर एका तरुणाने बिस्किटाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वसमत न्यायालयाने चौघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
वसमत तालुक्यातील हट्टा येथील एक कुटुंब आपल्या १३ वर्षांच्या गतिमंद मुलीला घरी ठेवून बाहेरगावी गेले होते ही संधी साधून गावातीलच तीन तरुणांनी त्या मुलीला बिस्किट आणि ५० रुपये देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून गावाशेजारी असलेल्या उसाच्या फडात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. या घटनेनंतर मुलगी प्रचंड घाबरलेली होती. कुटुंब घरी आल्यानंतर मुलीच्या वागण्यातील बदल त्यांच्या लक्षात आला. कुटुंबियांनी तिला दवाखान्यातही दाखवले. घरी आल्यानंतर तिचे कपडे चिखलाने माखलेले दिसले. मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
मुलीच्या कुटुंबाने बुधवारी रात्री उशिरा हट्टा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून विजय खाडे (२२), लखन खाडे (२४), प्रवीण खाडे (३८) आणि प्रकाश खाडे (२०) या चौघांवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक संजय केंद्रे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून लखन खाडे, प्रवीण खाडे, प्रकाश खाडे या तिघांच्या मुसक्या आवळल्या, तर फरार विजय खाडे याला सायंकाळी बेड्या ठोकण्यात आल्या. चारही आरोपींना वसमत न्यायालयासमोर उभे करण्यात आले आले. न्यायालयाने चौघांची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे




























































