मुंबईतील 21 लाख मतदारांना आयोगाची नोटीस, यादीतून नाव वगळल्याने कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार यादी विशेष पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेतून वगळल्या गेलेल्या 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांपैकी 1 कोटी 22 लाख मतदारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यात मुंबईतील 21 लाख मतदारांचा समावेश आहे.

माहिती न जुळलेले आणि माहिती जुळूनही त्यात विसंगती आढळलेल्या 36 जिह्यांतील 1 कोटी 22 लाख 24 हजार 7 मतदारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. यामध्ये मुंबई उपनगर (16,39,628), ठाणे (13,17,184) आणि पुणे (13,34,165) जिह्यातील सर्वाधिक मतदारांचा समावेश आहे. तर मुंबई शहरातील 4 लाख 58 हजार 545 मतदारांना आयोगाने नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवलेल्या मतदारांची सुनावणी घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच त्यांचा मतदार यादीमध्ये पुन्हा समावेश करायचा की नाही याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे.

  • एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्यात 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार होते. प्रारूप मतदार यादीमध्ये त्यातील 78.86 म्हणजे 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश झाला आहे. 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे.