
उत्सवांच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी होणारे ध्वनिप्रदूषण हा एक प्रकारे ‘सॉफ्ट हिंसाचार’च आहे. उत्सवांची नागरिकांना शिक्षा झाली असून सध्या ‘उत्सवांची दहशत’ निर्माण झाली आहे. जशी ‘लश्कर-ए-तोएबा’ ही दहशतवादी संघटना आहे, तशीच ‘लश्कर-ए-उत्सव’ अशी या उत्सवखोरांची अवस्था झाली आहे, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी मांडली.
सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण होत आहे. उत्सवांमुळे होणाऱया कोंडीचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. वाढत्या त्रासामुळे नागरिकांना आपले राहते शहर आणि घर सोडून जावे लागत असल्याचे सांगत गणेशोत्सवात डीजे लावण्याविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांनी सार्वजनिक सण-उत्सवांच्या बदलत्या स्वरूपावर संताप व्यक्त केला. उत्सव हा मुळात आनंदाचा असावा, पण आज त्याचे रूपांतर दहशतीत झाले असल्याचे मत बापट यांनी व्यक्त केले.
जिवंत राहिलो तर रविवारच्या मोर्चाला जाईन
मी जिवंत राहीलो तर रविवारच्या मोर्चात जाईन. मला भीती वाटत नाही, मात्र दाभोळकरांचे काय झाले, असा सवाल बापट यांनी केला. हा लढा यापुढेही असाच चालू राहील, असे ते म्हणाले.





























































