
डिझेलचा प्रचंड तुटवडा आहे. यामुळे दिवाळीनंतर डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. डिझेलचा तुटवडा हा आगामी 2027 पर्यंत असाच कायम राहण्याची भीती ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ने दरमहा प्रसिद्ध होणाऱ्या आपल्या ‘ऑइल मार्पेट रिपोर्ट’ मधून वर्तवली आहे.
‘आयईए’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार, वर्षाच्या ज्या काळात डिझेलची मोठी साठवणूक होणे अपेक्षित असते. त्याच काळात डिझेलचा साठा वेगाने कमी होत चालला आहे. यामुळे दिवाळीनंतर डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. जगभरातील स्टोरेज टँक्स आणि रिफायनरी साठे वेगाने कमी होत आहेत.


























































