
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात तब्बल 12 कोटी रोजगार निर्माण होईल, असे विधान केले आहे. सध्या देशात रॅपिडो, ओला आणि उबर या टॅक्सी सेवा पुरवणाऱया पंपन्यांनी देशात सर्वत्र आपला प्रसार केला आहे. आता गडकरी यांनी या पंपन्यांसाठी नवीन योजना आखली आहे. यातून देशात 12 कोटी लोकांना रोजगार मिळेल असे सांगितले. ते आपल्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
कॅनडातील एका प्रवासादरम्यान निवृत्त संशोधक खासगी वाहन टॅक्सी म्हणून चालवून अतिरिक्त उत्पन्न मिळवत असल्याचा अनुभव गडकरी यांनी यावेळी सांगितला. त्यातून खासगी वाहनांना टॅक्सी म्हणून मान्यता देण्याची कल्पना सुचल्याचे त्यांनी नमूद केले. 2018 मध्ये परिवहनमंत्री असताना यासंदर्भात निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला. रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या व्यासपीठांमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. 12 कोटी रोजगार मिळणार असल्याचे सांगून, अशा धोरणांचा विस्तार करण्याची गरज आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले.
पदवीधरांची मते अवैध, दुर्दैवी बाब
पदवीधर म्हणजे सुशिक्षित आणि विद्वान व्यक्ती होय. असे असतानाही पदवीधर मतदारसंघात तब्बल 12 हजार मते अवैध ठरतात, ही दुर्दैवी बाब आहे. हे टाळण्यासाठी पदवीधर मतदारांनी मतदानाची योग्य पद्धत समजून घेऊन वैध मतदान करावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.


























































