
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोटय़वधी ग्राहकांना ऐन सणासुदीत जोरदार झटका दिला आहे. एसबीआयने आपले कर्ज महाग केले आहे. त्यामुळे एसबीआयकडून कर्ज घेणाऱया ग्राहकांना आता ईएमआयसाठी जास्तीचा ईएमआय द्यावा लागणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची दरवाढ केल्यानंतर एसबीआयने आपल्या कर्जात वाढ करण्याची घोषणा केली आहे. एसबीआयचे हे नवीन वाढीव व्याजदर 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू झाले आहेत.
ट्रम्प हिंदुस्थानवर 100 टक्के टॅरिफ लावणार…
न्यूयॉर्क, दि. 15 (वृत्तसंस्था) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थानवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय येत्या दहा दिवसांत घेतील, अशी माहिती अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी दिली. हिंदुस्थानला 100 टक्के टॅरिफमधून सूट द्यायची की नाही, याचा निर्णयही ट्रम्प हेच घेतील, असे ते म्हणाले.
अमेरिकेन संसदेने 18 सप्टेंबरला रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱया देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचे विधेयक मंजूर केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनीही या कायद्याला मंजुरी दिली आहे. सध्या कोणत्याही देशांवर निर्बंध लादलेले नाहीत.


























































