हिंदू मंदिरावरील हल्ल्याचा डाव उधळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील इलनॉय येथील ऑरोरा परिसरात हिंदू मंदिरावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका 19 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. लेक्झांड्रोस पापोराकिस असे या तरुणाचे नाव असून तो अमेरिकेत राहणाऱया हिंदुस्थानी नागरिकांचा द्वेष करायचा. पोलिसांना त्याच्या घरातून रायफल, अनेक भरलेल्या मॅगझिन्स आणि शेकडो गोळय़ा सापडल्या आहेत. हा तरुण कोणत्या मंदिरावर हल्ला करणार होता, हे पोलिसांनी अद्याप उघड केले नाही. ऑरोरामध्ये श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिर आहे.

 

तामीळनाडूतील 25 मच्छीमारांना अटक

तामीळनाडूतील 25 मच्छीमारांना मालदीवच्या तटरक्षक दलाने अटक केली. त्यांच्या तीन बोटीही ताब्यात घेतल्या असून अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांची सुटका करण्यासाठी पेंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी तामीळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पेंद्र सरकारकडे केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून विजय यांनी ही मागणी केली आहे. पेंद्र सरकारने मालदीव सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करून मच्छीमारांची सुटका करावी, अशी मागणी विजय यांनी केली आहे.

 

जर्मनीत 3 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा मृत्यू

जर्मनीतील नॉर्थ राइन वेस्टफेलिया राज्यातील बोखुम शहरात एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तीन हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. हे विद्यार्थी शिक्षणासाठी जर्मनीत गेले होते. दरम्यान, प्राथमिक तपासात ही आग अपघाती नसून जाणीवपूर्वक लावल्याचा संशय आल्याने याच इमारतीत राहणाऱया 41 वर्षीय रोमानियन नागरिकाला हत्येच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. इमारतीत अडकलेल्या इतर पाच जणांना शिडी आणि रेस्क्यू कुशनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.