आता दिल्लीचे तख्त महाराष्ट्र काबीज करणारच; आदित्य ठाकरे यांचा विश्वास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान भाजपला बदलू देणार आहात का? आपल्या देशातील लोकशाही तुम्ही संपवू देणार आहात का? आज जर आपल्याला खरोखर देश वाचवायचा असेल, संविधानाचे रक्षण करायचे असेल, तर निवडणुकीत कोणाला जिंकून द्यायचे, हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. जास्तीत जास्त मतांनी इंडियाआघाडीचे सरकार आपल्याला दिल्लीत बसवायचे आहे. त्यामुळे एक मन की बात नहीं, सबके मन की बात होगीसबके दिल की बात होगी,’ असे सांगतानाच, ‘आता दिल्लीचे तख्त महाराष्ट्र काबीज करणारच,’ असा जबरदस्त विश्वास शिवसेना नेतेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘कोल्हापुरात आपलं ठरलंय नाहातात मशाल घेऊन विजयाची तुतारी वाजणार,’ असेही त्यांनी सांगितले.

 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या करवीर तालुक्यातील उंचगाव येथील जाहीर सभेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारच्या गेल्या 10 वर्षांतील एकाधिकारशाही कारभारावर त्यांनी कडाडून हल्लाबोल केला.

‘छत्रपती शाहू महाराजांचे घराणे काही साधे नाही. या घराण्याने कोल्हापूरसह महाराष्ट्राला मोठे प्रेम दिले. शाहू महाराज छत्रपती लोकसभा निवडणुकीला उभे राहतात, हे पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून छत्रपती घराण्याशी असलेले ऋणानुबंध जपले,’ असे सांगत, महाराजांविरोधात डरपोक आणि गद्दार उमेदवार उभा असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दाखविली आहे. हा शूरवीर मावळ्यांचा महाराष्ट्र आहे. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ याप्रमाणे आता दिल्लीचे तख्त महाराष्ट्र काबीज करणार आहे. दक्षिणेपासून उत्तरेतील राज्यात भाजपचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे ते 400 काय, 200सुद्धा पार होणार नाहीत. भाजपचा चारसो पारचा नारा आता थंडावल्याचे दिसत आहे.’ त्यामुळे ‘अब की बार 400 पार’ असे म्हणताच उपस्थित जनतेतून ‘तडीपार… तडीपार…’ अशा घोषणा देण्यात आल्या.

जो पेपर पह्डेल, त्याला आपण फोडू!

‘आपले सरकार आल्यानंतर जो पेपर फोडेल, त्याला आपण फोडू. कमीत कमी दहा वर्षांची शिक्षा घडवू,’ असे सांगत, ‘आज तरुणांच्या हाताला काम नाही. आमचं हिंदुत्व चूल पेटवणारं आहे, तर भाजपचं घर पेटवणारं हिंदुत्व असल्याचे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आज चारशे पार करण्यासाठी भाजपचे लोकप्रतिनिधी थेट संविधान बदलण्याची भाषा करीत आहेत. शेतकऱयांना मदत केल्याचे सांगणाऱया या सरकारने शेतकऱयांवर ड्रोनमधून अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या, गोळीबार केला, वाटेत खिळे ठोकून त्यांची अडवणूक केली. गुजरातमध्ये बिल्किस बानो या पीडितेवर अमानुष अत्याचार करणाऱया नराधमांना तुरुंगातून बाहेर काढून प्रचारात उतरवणाऱया भाजपला तुम्ही मतदान करणार का?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच जनसमुदायातून ‘नाही…नाही…’चा गजर झाला.

भाजपला लोकशाही संपवायची आहे; आम्ही ते होऊ देणार नाही!

‘‘भाजपचे टार्गेटच संविधान संपविणे हे आहे. भाजपला लोकशाही संपवायची आहे. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही,’’ असे शिवसेना नेते – युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे बोलत होते. या वेळी शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, देशातील लोकांना माहीत आहे, भाजपा पुन्हा जिंकली तर त्यांचं पहिलं टार्गेट संविधान बदलणं हे आहे? दुसरं म्हणजे भाजपाला लोकशाही संपवून टाकायची आहे. पण ते आम्ही होऊ देणार नाही. तसेच महाराजांविरुद्ध प्रचार करणे यातून भाजपचा महाराष्ट्रद्वेष दिसून येत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

‘भाजप सरकारने पहिल्यांदा गुजरातमधील कांदा निर्यातबंदी हटवली. त्यानंतर देशातील कांदा निर्यातबंदी हटवायला 48 तास लागले. यावरून जे काही सुरू आहे, ते फक्त गुजरातसाठी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘गेल्या अडीच वर्षांत अनेक कॉल दिल्लीतून आले? पह्न आल्यानंतर सगळे उद्योग गुजरातला जायला लागले, हेसुद्धा खरं आहे. गेल्या अडीच वर्षांत एकही नवा उद्योग राज्यात आला आहे का?’ असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘जॉईन ऑर जेल पॉलिसी’मध्ये रडगाणं गाऊन पळाले

 जे गद्दार गुजरात, गुवाहाटीला आणि गोव्याला पळतात, अशा गद्दारांकडे आपण लक्ष देत नाही. ‘जॉईन ऑर जेल पॉलिसी’मध्ये ते रडगाणं गाऊन पळाले. जे डरपोक आहेत, ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ शकत नाहीत. गेल्या पाच वर्षांत महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱयांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. कुठेही सरकार आहे असं जाणवत नाही. सगळे खोके घेण्यात मग्न असल्याचे चित्र असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.