उद्या आदित्य ठाकरे पुण्यात, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात होणार सहभागी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे मंगळवारी 6 ऑक्टोबर रोजी पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी X वर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. या पोस्टमधून आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

पुण्यात एस.एम. जोशी पुलाजवळ गुरुवारपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे मंगळवारी या आंदोलकांची भेट घेणार आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे.

”आत्ताच विवेकानंद पाटील यांच्याशी बोलणं झालं. उद्या मी पुण्यात MPSCच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसोबत जाऊन बसणार आहे. पण एक गोष्ट अजूनही समजत नाही, ती ही की किती कोणी निर्दयी असावं! अहो, MPSC चे अध्यक्ष महाशय, हजारो-लाखो विद्यार्थी तुम्हाला नाकारताहेत. बाजूला व्हा, सांगताहेत. गद्दार ज्ञानेशकडून धडे घेतले का आपण? की आता विद्यार्थ्यांनी येऊन बसायचं MPSCच्या दारात आणि मगच आपण राजीनामा द्याल?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमधून केला आहे.