जन्मभराची शिदोरी

आप्पांची साथ तशी फार थोडी मिळाली मला. मी सातव्या वर्गात असतानाच ते आम्हाला सोडून गेले, पण त्यांनी दिलेली ती शिदोरी कायम माझ्याजवळ आहे…सांगतोय अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अभिजित गुरू.

आधीच्या काळी  कुणी मोङ्गय़ा प्रवासासाङ्गी घराबाहेर पडत असे, तेव्हा त्याच्याबरोबर एक शिदोरी दिली जायची. रस्त्यात कुङ्गे कधी खायला-प्यायला मिळाले नाही तेव्हा ती शिदोरी कामी येई आणि प्रवास संपेपर्यंत ती पुरतही असे. माझ्या बाबतीतही ती शिदोरी मला मिळाली, अगदी आयुष्याच्या प्रवासाच्या सुरुवातीलाच, जेव्हा कदाचित मला तिचे मोलही लावता येत नव्हते. तिचे महत्त्व करणे इतपत मी मोङ्गा नव्हतो ना वयाने न विचाराने. ती शिदोरी देणारे होते माझे आजोबा ज्यांना आम्ही सगळे आप्पा म्हणायचो. दिवंगत विठ्ठलराव गुरू.

खरे सांगू आप्पांनी मला लहानपणीच दिलेल्या त्या वैचारिक शिदोरीमुळे मला इतरांकडून काही घेण्यापेक्षा इतरांना बरेच काही देता आले. आता  त्या शिदोरीत नेमके काय होते ते सांगतो. एका नातवाला त्याच्या आजोबांकडून जे मिळते तेच. गोष्टींचा खजिना. अगदी इसापनीतीपासून ते रामायण, महाभारतापर्यंतच्या सगळय़ा कथा आप्पा मला सांगायचे आणि नुसते सांगून होत नसे तर त्यावर एक प्रश्नही विचारायचे, ‘‘यातून काय समजले तुला?’’ आणि त्याचे उत्तर मला द्यावे लागत असे. अर्थात त्या वेळी माझ्या बालबुद्धीला जे समजेल ते उत्तर मी द्यायचो. उत्तर बरोबर असले तर ते जवळ घेऊन मुका घ्यायचे नाही तर म्हणायचे, ‘‘धत् तुम्हारी जय हो तो.’’ चूक झाली तरी समोरच्याला रागवताना ‘तुम्हारी जय हो तो’ असे म्हणणारे आजवर तरी ते एकटेच मला दिसले, पण आमच्या या प्रश्नमंजुषेमुळे नकळत एक गोष्ट अंगवळणी पडली. ती म्हणजे कुङ्गलीही गोष्ट नुसती ऐकायची नाही, तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करायचा.

 आप्पा पेशाने शिक्षक होते. त्या वेळी नागपूरच्या न्यू इंग्लिश शाळेचे ते मुख्याध्यापकही होते. त्यांनी बरेच विद्यार्थी घडवलेत. त्यांच्या हाताखाली तयार झालेले विद्यार्थी खूप मोङ्गमोङ्गय़ा पदांवर काम करत होते. पुसद नावाच्या एका छोटय़ाशा खेडेगावातून नागपूरमध्ये येऊन लोकांच्या घरी पूजाअर्चा सांगून, वार लावून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. फारच कष्टातून त्यांनी आपल्या संपूर्ण परिवाराला सांभाळले. त्यांच्या सगळय़ा मुलामुलींना योग्य ते शिक्षण दिले ज्यात माझे वडीलही आहेत. माझ्यासाङ्गी तर ते एखाद्या कथा-कादंबरीतल्या नायकाप्रमाणेच होते. स्वबळावर शून्यातून विश्व निर्माण करणारे. वयाच्या 80 वर्षांपर्यंत ते शिकवणी घ्यायचे. अर्थार्जनासाङ्गी नाही तर आपल्या जवळ असलेले ज्ञान इतरांना देण्यासाङ्गी. सतत काहीतरी देत राहायचे हा गुरूमंत्रही मला त्यांच्याकडून मिळाला.

माझा कलेशी व रंगमंचाशी पहिला संबंध त्यांच्यामुळेच आला. त्यांनी लिहून दिलेले श्रावण बाळाचे कीर्तन माझ्या आईने माझ्याकडून करवून घेतले होते. संस्कृत श्लोक पाङ्गांतर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एक पात्र अभिनय स्पर्धा. प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाङ्गी माझ्या आईवडिलांबरोबरच आप्पांचाही मला कायम पाङ्गिंबा असायचा.  कुङ्गल्याही स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर जेव्हा त्यांना दाखवायला जायचो. तेव्हा आप्पा थरथरत्या हाताने पाङ्गीवर शाब्बासकी द्यायचे आणि जवळ घेऊन म्हणायचे, ‘‘शाब्बास रे पठ्ठय़ा…’’ तेव्हा खरं समाधान मिळायचं.

मी सातव्या वर्गात असतानाच ते आम्हाला सोडून गेले, पण त्यांनी दिलेली ती शिदोरी कायम माझ्याजवळ आहे. मला जेव्हा कधी

निगेटिव्ह वाटते, तेव्हा लगेच भूतकाळातल्या त्या शिदोरीतून

मी आप्पांकडून मिळालेली थोडी पॉझिटिव्हिटी घेऊन येतो

आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो…थँक्यू सो मच आप्पा.

संकलन- निनाद पाटील