एअर हॉस्टेसची नोकरी सोडून सुरू केला वेश्याव्यवसाय, 26 वर्षीय तरुणीला अटक

व्हिएतनाममधील हो ची मिन्ह शहरात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी येथील एका हॉटेलवर धाड घालून एक एअर होस्टेस चालवत असलेले सेक्स रॅकेट उघडकीस आणले. याप्रकरणी वो थी माय हान या एअर हॉस्टेसला पोलिसांनी अटक केली. तिच्या सह तीन फ्लाईट अटेंड देखील या सेक्स रॅकेटमध्ये सामिल असल्याचे समोर आले आहे.

बुधवारी संध्याकाळी पोलिसांनी हो ची मिन्ह सिटीमधील एका हॉटेलवर धाड घातली. पोलिसांना हॉटेलमध्ये तीन फ्लाइट अटेंडंट वेगवेगळ्या पुरुषांसह रुममध्ये बेडवर आढळल्या. या हॉटेलमध्ये वो थी माय हान ही सेक्स रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय होता.

वो थी माय हान ही व्हिएतनाम एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस होती. तिने काही महिन्यांपूर्वी तिची नोकरी सोडून पूर्ण-वेळ या धंद्यावर लक्ष केंद्रित केले आणि एअरलाइन्सच्या क्रूलाही यामध्ये सामील करून घेतले. प्रत्येक ग्राहकाकडून ती 90 मिनिटांसाठी 700 डॉलर्स आणि एका रात्रीचे 2000 डॉलर्स आकारायची. पोलिसांनी सांगितले की तिने अवघ्या काही महिन्यांत स्वतःसाठी एक अब्ज पेक्षा जास्त डॉलर्स कमावले आहेत.

तिने विमानसेवा सोडली असली तरीही तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये ती व्हिएतनाम एअरलाइन्समध्ये केबिन क्रू असल्याचेच तिने म्हटले आहे. पोलीस अधिका-यांनी याबाबत सांगितले की इतर महिलांना तिच्या जीवनशैलीत आकर्षित करण्याचा हा एक भाग होता. पोलीस आता वेश्याव्यवसायात गुंतलेल्या इतरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वो थी माय हान मुलींना आकर्षित करण्यासाठी तिच्या ऐशोआरामाच्या जीवनाचे फोटो शेअर करत असे.

वो थी माय हान ने अनेक फ्लाइट अटेंडंट, ‘हॉट गर्ल्स’ आणि फोटो मॉडेल्सशी संपर्क केल्याचे कबूल केले आहे. या सर्वांचे ती फ्लाइट अटेंडंटच्या गणवेशातील छायाचित्रे पाठवून ती ग्राहकांना भुरळ पाडत असे. या साऱ्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सध्या सुरु आहे.