Lok Sabha Election 2024 : लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या बृजभूषण सिंह यांचं तिकीट भाजपने कापलं

कर्नाटकमधील भाजपचे विद्यमान खासदार आणि हासन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांचं सेक्स स्कँडल प्रकरण गाजत आहे. ऐन निवडणुकीत भाजप खासदाराचे सेक्स स्कँडल उघड झाल्याने भाजपची नाचक्की झाली आहे. आता उत्तर प्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करत भाजपने बृजभूषण सिंह यांचा पत्ता कापला आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असलेले बृजभूषण सिंह यांना भाजपने उमेदवारी दिलेली नाही.

भाजपने उत्तर प्रदेशातील दोन हायप्रोफाइल मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून बृजभूषण सिंह यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी दिल्लीतील राउज एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सेक्स टेप लीक करणारा प्रज्ज्वल रेवन्नाचा ड्रायव्हर बेपत्ता

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी दिल्लीत जंतर-मंतर इथे बृजभूषण सिंह यांच्याविरोधात निदर्शनं केली होती. तसेच तरुण ज्युनिअर पैलवानांचा छळ केल्याचा आरोपही केला होता.

बलात्काऱ्याला देशाबाहेर पळू देणं हीच मोदींची गॅरंटी, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

कैसरगंज लोकसभा मतदारसंघात बृजभूषण सिंह यांचा दबदबा आहे. गेल्या 30 वर्षांपासून त्यांचं या मतदारसंघावर वर्चस्व आहे. भाजपने बृजभूषण सिंह यांचा पत्ता कट केला असला तरी त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना इथून उमेदवारी दिली आहे. भाजपने कैसरगंजसोबतच रायबरेली या हायप्रोफाइल मतदारसंघासाठीही उमेदवाराची घोषणा केली आहे. दिनेश प्रताप सिंह यांना रायबरेलीतून उमेदवारी जाहीर झाली आहे.