अजित पवार गटातील मंत्र्यांपाठोपाठ जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड वायबी सेंटरकडे रवाना

अजित पवार गटाचे सर्व मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे देखील वायबी चव्हाण सेंटरकडे रवाना झाले आहेत. यावेळी पाटील म्हणाले की, ‘यशवंराव चव्हाण सेंटरला कोण आलंय हे मला माहीत नाही. मला सुप्रिया सुळे यांचा फोन होता. त्यामुळे मी वायबी चव्हाण सेंटरकडे जात आहे, बाकी मला काही माहीत नाही.’