मुंबई विभागातील पंधरा स्थानकांचा विकास होणार

अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पंधरा स्थानकांचा विकास होणार आहे.  भायखळा, चिंचपोकळी, परळ, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, विक्रोळी, कांजुरमार्ग, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, इगतपुरी, वडाळा, सँडहर्स्ट रोड या पंधरा स्थानकांचा यामध्ये समावेश आहे. या स्थानकांच्या विकासासाठी शेकडो कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.